बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे नाते नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहे. त्यांचे ब्रेकअप- पॅचअप आणि त्यांच्या लग्नाच्या तर अनेक बातम्या कानावर येतात. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नसला तरी हे सर्वांना माहित असलेलं गुपीत आहे. पण आता खुद्द दीपिकानेच तिच्या आणि रणवीरच्या नात्याबद्दल थोडासा खुलासा केला आहे.

ranveer, deepika रणवीर सिंग, दीपिका पदुकोण[/caption]

नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने म्हटले की, ‘आम्ही सोबत असल्यावर आम्हाला इतर कोणाची गरज भासत नाही.’ फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या या मुलाखतीत दीपिकाने लग्न आणि रणवीरसोबतचे तिचे नाते यावर खुलून चर्चा केली. ती म्हणाली की, ‘आम्ही एकमेकांसोबत फारच आनंदी असतो. कधी- कधी आम्ही गंभीर विषयावरही चर्चा करतो. तर कधी आम्ही एकदमच शांत असतो. तर कधी आम्ही दोघंही एखाद्या लहान मुलासारखे वागतो.’

Virat Kohli is Damaad Of Shahrukh Khan
“विराट कोहली आमचा जावई, पण वाईट वाटतं की..”, शाहरुख खानने सांगितलं नातं, म्हणाला, “बाकी खेळाडूंपेक्षा त्याला…”
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”

रणवीर आणि दीपिकाचे चाहते त्यांचा लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सध्या तरी त्यांच्या लग्नाची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. लग्नाच्या प्रश्नावर दीपिका म्हणाली की, ‘आता याहून पुढे काय असू शकतं? मी लग्न कधी करेन माहित नाही पण मी नात्यावर विश्वास ठेवते.’
दीपिकाने हेही सांगितले की तिला गृहिणी व्हायला फार आवडेल. तिला स्वतःचे कुटुंबही हवे आहे. पण या साऱ्या गोष्टी कधी होतील हे मात्र तिलाही माहीत नाही. ‘मला गृहिणी व्हायला फार आवडेल. जेव्हा मी लहान होते तेव्हापासूनच मला गृहिणी व्हायचे होते.’ या मुलाखती दरम्यान दीपिकाने ब्रेकअप आणि नैराश्य हा तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ सांगितला.