संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्याबरोबरच एक जुना ट्रेण्ड पुन्हा एकदा नव्याने समोर आला. या पोस्टरमधील दीपिकाच्या भुवयांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये तिच्या भुवया जोडलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. तिचा हा लूक काहींना आवडला तर काहींनी याबद्दल नापसंती दर्शवली. दोन्ही भुवया एकमेकांना जोडलेल्या असतात त्याला ‘यूनीब्रो’ असे म्हणतात.
फार कमी लोकांच्या भुवया या अशा जोडलेल्या असतात. ‘पद्मावती’ सिनेमात दीपिका राजपूत महाराणीशी साधर्म्य साधणारी व्यक्तिरेखा साकारत आहे. असे म्हटले जाते की, राणी पद्मावतीच्या बहुतांश चित्रांमध्ये त्यांच्या भुवया या एकमेकांना जोडलेल्या दाखण्यात आल्यात. त्यामुळे दीपिकाचा मेकअप करताना याची काळजी घेण्यात आली आहे . दीपिकाच्या या लूककडे ‘ट्रेंड सेटर’ म्हणून पाहिले जात आहे. पण दीपिकाच्या आधीही मनोरंजन क्षेत्रातील अनेक व्यक्ती ‘यूनीब्रो’ लूकसाठी प्रसिद्ध होत्या.
https://www.instagram.com/p/BXNHczOgO1Q/
https://www.instagram.com/p/BVw0SBtAeUL/
दीपिकाच्या आधी बॉलिवूडची डस्की ब्युटी अशी ओळख असलेली काजोलही तिच्या सुरूवातीच्या काळात जोडलेल्या भुवयांमुळे विशेष चर्चेत असायची. काळ बदलत गेला तशी फॅशनही बदलत गेली पण ग्लॅमरच्या दुनियेत अधिक सुंदर दिसण्यासाठी तिने कधीही ‘यूनीब्रो’ हटवले नाही. तिच्या चेहऱ्यावर हे यूनीब्रो खुलूनही दिसतात.
https://www.instagram.com/p/BZUtDVMhwYA/
https://www.instagram.com/p/BZcchLBh8Wu/
तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय फॅशन ट्रेण्डबाबत बोलायचे झाले तर काही मॉडेल्सनाही यूनीब्रोबद्दल फार आकर्षण असते. विश्वास बसत नाहीये ना… पण हे खरंय. ग्रीक मॉडेल सोफिया हदजीपंतली हिला तिच्या जोडलेल्या भुवयांमुळेच ओळखले जायचे. सोफिया ही इन्स्टाग्रामवर फोटो टाकणाऱ्या मॉडेल्सप्रमाणे अजिबात नाहीये. तिने प्रस्थापित गोष्टींना छेद देत नव्या गोष्टी ट्रेण्डमध्ये आणल्या. सोफिया आपल्या या आगळ्या वेगळ्या लूकबद्दल सांगताना म्हणते की, ‘माझा हा लूक मी स्वतःसाठी ठेवत नाही. अनेक लोक मेसेज किंवा फोन करुन माझा हा लूक त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगतात. मी त्यांच्यासाठी माझा हा लूक ठेवते.’
https://www.instagram.com/p/BZHMVOcHxsL/
https://www.instagram.com/p/BY8QjU8AU0d/
फ्रीडा काहलो ही मेक्सिकन चित्रकारही तिच्या जोडलेल्या भुवयांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. फ्रीडा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याच लूकमधील फोटो शेअर करत असते.