बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंग- दीपिका पदुकोणने लग्नाची तारीख नुकतीच जाहीर केली. १४ आणि १५ नोव्हेंबर हा विवाहसोहळा पार पडणार असून विवाहस्थळाबाबतची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. इटलीतीली लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी हा सोहळा पार पडणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण आता काही कारणास्तव रणवीर- दीपिकाचं लग्न इटलीत नव्हे तर मुंबईत होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘मिड डे’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील वाकोला इथं बॉलिवूडमधला हा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा पार पडणार आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांचा विचार करता या दोघांनी इटलीऐवजी मुंबईलाच पसंती दिल्याचं समजतंय.

https://www.instagram.com/p/Boji8dfB4Dl/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीत, मेहंदी, लग्नविधी आणि रिसेप्शन वाकोला इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. या लग्नसमारंभाच्या नियोजनासाठी दीप- वीरने सोनम कपूर- आनंद अहुजाच्या लग्नाच्या नियोजकांचीच निवड केली आहे. सोनम आणि आनंदचं लग्नसुद्धा मुंबईतच पार पडलं होतं.

दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय या दोन्ही पद्धतींनी लग्नाचे विधी होणार आहेत. चार दिवसांचा हा सोहळा १३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याप्रमाणे लग्नविधीसाठी फक्त जवळचे नातेवाईकच उपस्थित राहणार आहेत. विवाहसोहळ्यानंतर भारतात मित्रपरिवार आणि संपूर्ण बॉलिवूडसाठी रिसेप्शनचंही आयोजन करण्यात येणार आहे.