गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील आणि तितकच लोकप्रिय कपल दीप-वीर लग्न बंधनात अडकले. बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव इटलीमध्ये एक वर्षापूर्वी लग्न बंधनात अडकले. मात्र त्यांच्या लग्नाचा थाट आजही लोकांच्या डोळ्यासमोर उभा असल्याचे पाहायला मिळते. उद्या दीपका आणि रणवीरच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आता दीपिका आणि रणवीर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस कुठे साजरा करणार हे जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहेत. त्यातच दीपिकाने रणवीरचा फोटो शेअर करत तो लग्नाच्या वाढदिवसाठी जोरदार तयारी करत असल्याचे म्हटले आहे.
नुकताच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीरने चेहऱ्याला फेस मास्क लावल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत दीपिकाने मजेशीर कॅप्शन दिले आहे. रणवीरचा फोटो शेअर करत दीपिकाने ‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची जोरदार तयारी’ असे कॅप्शन दिले आहे. रणवीरचा फोटो आणि कॅप्शन पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारा दीपिका आणि रणवीरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा स्पेशल प्लॅन आखला आहे. ते प्रथम तिरुपती बालाजीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर पद्मावती मंदिरातही जाणार आहेत. हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्याच जवळ आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तिर्थस्थळांचे दर्शन घेतल्यानंतर ते अमृतसरमधील सुवर्णमंदिर येथे जाणार आहे. त्यानंतर १५ तारखेला ते परत मुंबईमध्ये परतणार आहेत.