डॉक्टर डॉन या झी युवावरच्या मालिकेमुळे अभिनेता देवदत्त नागे एका मोठ्या अवधीनंतर पुन्हा टिव्हीच्या छोटया पडद्यावर दिसू लागलाय. जय मल्हार या मालिकेच्या घवघवीत यशानंतर देवदत्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर अनेकांच्या देव्हाऱ्यापर्यंतही पोहोचला. आता डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये देवदत्त देवा या डॉनची भूमिका साकारतोय. या मालिकेत पाहायला मिळणारी देवा आणि डॉ मोनिका यांची ‘खट्टी मिठी नोक झोक’ सध्या प्रेक्षकांना चांगलीच भावतेय.
देवदत्तचा हा देवा प्रेक्षकांना पसंत पडतोय आणि डॉ मोनिका आणि देवाची प्रेमकहाणी लवकर सुरु व्हावी अशी आशाही प्रेक्षक बाळगून आहेत. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आपल्या देवदत्तची एक लांबलचक प्रेमकहाणी सुरु आहे. नाही, नाही त्याच्या बायकोसोबतच नाही तर ही प्रेमकहाणी आहे त्याच्या बाईकसोबतची. देवदत्त प्रत्यक्ष आयुष्यात बाईक्ससाठी क्रेझी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स चालवायच्या इतकंच नाही तर बाईक्सचे नवनवे मॉडेल्स शोधायचे या सगळ्या गोष्टी देवदत्त उत्साहाने करत असतो आणि यासंदर्भातली सगळी माहिती तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन देतही असतो.
नुकतंच देवदत्तनं बाईकच्या या प्रेमापोटी त्याला अचानक मिळालेल्या अनोख्या टॅटूबद्दलची अपडेट सोशल मिडीयावर दिली. विशेष म्हणजे हा टॅटू देवदत्तने कुठल्याही प्रोफेशनल टॅटू डिझायनरकडून नव्हता काढला तर बाईक चालवताना रस्त्यावरचा चिखल त्याच्या टीशर्टमागे उडाला आणि तो असा काही छापला गेला, की त्याच्यासाठी जणू काही ती टॅटूची नवी डिझाईनच. इन्स्टाग्रामवर देवदत्तने हे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांकडून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.