झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यावरच प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. प्रेक्षकांची ही लाडकी मालिका आता त्यांचा निरोप घेणार असून त्याजागी ‘ती परत आलीये’ ही सस्पेन्स थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवळपास वर्षभर देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेला निरोप देताना वाईट वाटणं साहजिक आहे. पण प्रेक्षकांसाठी या मालिके शेवट १५ ऑगस्ट रोजी २ तासांच्या विशेष भागात सादर केला जाणार आहे. डॉ. अजितकुमार देव याचा मुखवटा अखेरीस आता उतरणार असून त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे.

आणखी वाचा : ‘ती परत आलीये…’ मालिकेतील ‘ती’ आहे तरी कोण आहे?

डॉक्टर हा देवीसिंग आहे हे आता सगळ्यांना कळणार आहे. ही मालिका आणि देवीसिंगची भूमिका खूप जवळची असल्यामुळे या मालिकेला निरोप देताना मन भरून आलं अशा भावना अभिनेता किरण याने व्यक्त केल्या. त्याबद्दल बोलताना किरण म्हणाला, “देवमाणूस या मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. हा कार्यक्रम आणि माझी त्यातील भूमिका हि नेहमीच माझ्या जवळची राहील कारण या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठिंबा मिळवून दिला. ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे जे अढळ आहे. सध्या डॉक्टर अजितकुमारच्या भूमिकेला जरी पूर्णविराम लागला असला तरी पुन्हा एकदा वेगळं काहीतरी घेऊन मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होईन. तो पर्यंत प्रेक्षकांनी अजितकुमारवर प्रेम करत राहाव आणि हा विशेष भाग जरूर पाहावा.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus serial doctor ajit singh truth coming out avb