छोट्या पडद्यावर गोपी बहू म्हणून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. फोटोंसोबतच अलिकडे अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत देवोलीना चाहत्यांसोबत संवाद साधत असते. मालिकेमध्ये सोज्वळ, निरागस सुनेची भूमिका साकारणाऱ्या देवोलीनाचा सोशल मीडियावर मात्र बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नुकताच देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतील देवोलिनाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. तर काही नेकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
देवोलीनाने बिकिनी परिधान करून बेली डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात देवोलीनाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. तर गार्डनमध्ये ती बेली डान्स करताना दिसतेय. देवोलीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिलीय तर काही नेटकऱ्यांनी मात्र पुन्हा एकदा देवोलीनाला ट्रोल केलंय.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत देवोलिना कॅप्शनमध्ये म्हणाली, “मर्यादीत राहू नका आणि म्हणूनच मी ट्रेंडचा वारसा पुढे सुरु ठेवत आहे.”देवोलीनाच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, “गोपी बहूचे लक्षण मला आधीपासूनच ठिक दिसत नव्हते.” तर दुसरा युजर म्हणाला, “कपडे नाही का?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “गोपी बहू थोडी लाज बाळग”

या व्हिडीओवर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हंटलं, “गोपी बहू घोर अनर्थ” यापूरर्वी देखील देवोलीनाने बेली डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हडिओवर देखील नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं होतं.