#Zingaat गेल्या काही दिवसांपासून ज्या गाण्याची बी-टाऊनमध्ये चर्चा पाहायला मिळाली, अखेर ते गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधील ‘झिंगाट’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. मराठी ‘झिंगाट’ गाण्याची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये असताना आता हिंदी झिंगाटही प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘धडक’ या चित्रपटातील दुसरं गाणं ‘झिंगाट’ प्रदर्शित झालं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहिलं असून अजय- अतुलनं ते संगीतबद्ध केलं आहे. इशान खट्टर यामध्ये परश्याची भूमिका साकारत असून त्याचा डान्स या गाण्यात लक्षवेधी ठरतोय असं म्हणायला हरकत नाही.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Viral video captain proposes flight attendant
तू माझ्याशी लग्न करशील? पायलटने भर विमानात गुडघ्यावर बसून प्रेयसीला घातली लग्नाची मागणी
Ranveer Singh Angry Criticizes Narendra Modi Calls PM
“नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

 

फराह खानने या गाण्याची कोरिओग्राफी केली असून यामध्ये जान्हवी कपूरचीही झलक पाहायला मिळते. मराठी ‘झिंगाट’चं हे हिंदी व्हर्जन सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड होत आहे.

इशान खट्टर आणि जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘धडक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खैतान याने केलं आहे. २० जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जान्हवी आणि इशानच्या करिअरसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच याची तुलना ‘सैराट’शी होऊ लागली आहे. त्यामुळे झिंगाट या गाण्याचीही तुलना होणे साहजिक आहे. प्रेक्षकांना हा रिमेक कितपत आवडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.