बॉलिवूडची धक धक गर्ल असलेल्या माधुरी दीक्षितचा madhuri dixit चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या अदांनी आणि हास्याने आजवर अनेकांना घायाळ केले आहे. यात सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटींचाही समावेश होतो. बॉलिवूडच्या या धकधक गर्लला पाहण्यासाठी आजही चाहत्यांची झुंबड उडते. ती आता चित्रपटसृष्टीपासून दुरावली असली तरी तिच्या चाहत्यांच्या संख्येत तिळमात्र घट झालेली नाही. माधुरीचे चाहते ती ऑनस्क्रीन आल्यावर तिला पाहतच राहायचे. तुम्हाला माहितीये का, एकेकाळी सुरेश वाडकर suresh wadkar यांना माधुरीचे स्थळ आले होते. पण, सुरेश वाडकरांनी चक्क माधुरीच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावला होता.

वाचा : प्रेमासाठी मुस्लिम धर्म स्वीकारणारे बॉलिवूड सेलिब्रिटी

sharad pawar on religion basis reservation
“धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण

माधुरीचं घर पारंपरिक विचारांच असल्यामुळे त्यांना माधुरीने चित्रपटांमध्ये काम करणे पसंत नव्हते. तिने फक्त घर-संसार सांभाळावा या विचारांचे ते होते. त्यामुळेच खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. वराच्या शोधात माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे तिचं स्थळ घेऊन गेले. त्यावेळी वाडकरांनी संगीत क्षेत्रात स्वतःचं करिअर करण्यास सुरुवात केली होती. माधुरीच्या आणि वाडकर यांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. त्यावेळी वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत फेटाळला होता. त्यामुळे माधुरीचे वडील निराश होऊन घरी परतले. पण, त्यावेळी मिळालेल्या एक नकारामुळे माधुरीचं ग्लॅमरस करियर घडलं आणि ती मोठी स्टार बनली. पुढे अनेकदा माधुरीच्या चित्रपटांसाठी सुरेश वाडकरांनी पार्श्वगायनही केलं.

फोटो : दिशा पटानीच्या मादक अदांचा नजराण

या सर्व घटनेनंतर माधुरीने १९८४मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलगे असून, ती संसारात रमली आहे.