‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. धनश्री आई होणार असून सोशल मीडियावर नुकतीच तिने ही गुड न्यूज दिली. तिने बेबी बंपसह फोटोशूट केलं असून त्याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री अल्पावधीत प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणाऱ्या नंदिता वहिनी म्हणून तिची ओळख आहे. धनश्रीने पतीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट करत गरोदर असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने नवीन फोटोसुद्धा पोस्ट केले. धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा : काजल अगरवालच्या साखरपुड्याचा फोटो; होणाऱ्या पतीने केला पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. ‘माझिया प्रियाला..’ मध्ये तिने अगदी खलनायिकी अशी नाही पण तशीच काहीशी छटा असणारी भूमिका साकारली होती. तर ‘गंध फुलांचा…’ मालिकेत ती अगदी सोज्ज्वळ भूमिकेत होती. पण, नंदिता वहिनीच्या भूमिकेने धनश्रीला आज वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.