दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची प्रकृती खालावल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच सायरा बानू लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेते धर्मेंद्र हे देखील सायरा बानो यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत. अभिनेते धर्मेंद्र आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यां दोघांमधील घट्ट मैत्रीचं नातं जगजाहीर आहे.

एका माध्यमाशी बोलताना अभिनेते धर्मेंद्र यांनी सायरा बानू यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे. चार दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांचं सायरा बानू यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. धर्मेंद्र यांनी चार दिवसांपूर्वी सायरा बानू यांना फोन केला होता. पण तो कॉल उचलला गेला नाही. त्यानंतर फोनवर मिस्ड कॉलपाहून सायरा बानू यांनी धर्मेंद्र यांना पुन्हा कॉल बॅक केला होता. याविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “त्या माझा पहिला कॉल उचलू शकल्या नाहीत, पण थोड्या वेळाने त्यांनी मला परत कॉल बॅक केला होता…त्यावेळी त्यांची तब्बेत ठीक नसल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं.”

यापुढे बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “त्यावेळी सायरा बानू यांच्यासोबत जास्त बोलणं होऊ शकलं नाही. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सारया बानू यांच्यासाठी खूपच कठीण काळ होता. सारं काळ रिकामं असल्यासारखं त्यांना वाटत असणार आणि हे आपण सर्वच जण समजू शकतो.”

सायरा बानू यांची प्रकृती खालावल्याने धर्मेंद्र चिंतेत आहेत. सायरा बानू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळाल्यानंतर आता त्यांची प्रकृती कशी आहे, याची चौकशी करण्यासाठी ते कॉल करणार आहेत, असं देखील त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे सायरा बानू लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी याव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना करणार असल्याचं देखील धर्मेद्र यांनी सांगितलं.

आणखी वाचा : कियारा आडवाणीच्या टॉपलेस फोटोशूटवर डब्बू रतनानी यांचा खुलासा, फॅन्स आश्चर्यचकित !

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सायरा बानू आणि त्यांच्या कुटुंबाचे खूप जवळचे मानले जातात. यामुळे ते सायरा बानू यांच्या खालवत असलेल्या प्रकृतीमुळे ते स्वत: गेल्या काही दिवसांपासून झोपू शकले नाहीत.

गेल्या तिन दिवसांपासून त्यांना रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. सायरा बानू या दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची काळजी घेत होत्या. दिलीप कुमार रुग्णालयात असताना सायरा बानू त्यांच्या प्रकृती विषयी माहिती देत असत. त्यांच्या लग्नाला ५४ वर्षे झाली होती. आता सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहेत.