भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या ‘शोले’ चित्रपटातील जय-विरुची जोडी सुपरहिट ठरली. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाचा उल्लेख करत धर्मेंद्र यांनी बिग बींवर निशाणा साधला.

”शोले’तील भुमिकेसाठी अमिताभ यांची शिफारस मीच केली होती. याचं श्रेय ते आता मला देत आहेत. आज ते यशाच्या शिखरावर आहेत, त्यामुळे लोक फक्त त्यांच्या महानतेबद्दलच बोलतील. मी शिफारस केल्याचं त्यांनी यापूर्वी कधीच म्हटलं नव्हतं. इतकं यश संपादन केल्यानंतर त्याचं श्रेय ते मला देऊ लागले आहेत तर लोक त्यांनाच महान समजतील, मला नाही,’ असं धर्मेंद्र म्हणाले.

वाचा : शशी कपूर यांच्याबद्दलच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

अमिताभ आणि धर्मेंद्र जोडीने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. बऱ्याच चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं. यामध्ये ‘शोले’, ‘दोस्त’, ‘चुपके-चुपके’, ‘ राम बलराम’, ‘सूरमा भोपाली’, ‘अंधा कानून’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.