‘तू लाठी आण.. आम्ही हिंमत आणू, तू शिव्या आण.. आम्ही संयम आणू’, अशा शब्दांत मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसने जेएनयू घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. समीरने ट्विटरवर ही कविता पोस्ट केली आहे. जेएनयू विद्यापीठ संकुलात झालेल्या तोडफोडप्रकरणी बऱ्याच कलाकारांनी आवाज उठवला आहे. यामध्ये मराठी कलाकारसुद्धा मागे नाहीत. सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे यानंतर आता समीरने कवितेद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.
समीरने पोस्ट केलेली कविता-
— Sameer Vidwans (@sameervidwans) January 8, 2020
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेसुद्धा जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदविला आहे. मंगळवारी सायंकाळी तिने जेएनयू विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या हल्ल्यानंतर कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि मोदी सरकारवर जाहीर टीकाही केली. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले. तेथे सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, कलाकार सहभागी झाले होते.
आणखी वाचा : ‘मार लो डंडे, कर लो दमन…’; स्वानंद किरकिरेंची मनाला भिडणारी कविता
तोडफोडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या दोन एफआयआरमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या आइशी घोष यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. संकुलात ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात घोष जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी रविवारी रात्री दोन एफआयआर दाखल केले. हिंसाचारप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही.