बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुसऱ्यांदा लग्न केले. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित तिने वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली. दियाने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्या फोटोच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
नुकताच दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून हा फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोत एक महिला पुजारी दिसत आहे. आता पर्यंत कधीच कोणत्याही लग्नात आपण महिला पुजारीला पाहिलं नसेल. मात्र दियाच्या लग्नाच्या सगळ्या विधी या महिला पुजारीने केल्या आहेत. दियाच्या लग्नात लक्ष वेधनाऱ्या आणखी काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे दियाच्या लग्नात डेकोरेशन पासून ते सामग्री पर्यंत वापरण्यात आलेल्या सगळ्या वस्तू या इकोफ्रेंडली होत्या त्यात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकॉल वापरण्यात आले नव्हते. दियाच्या लग्नात कन्यादान आणि बिदाई हे दोन पारंपरिक विधी टाळण्यात आले. त्यावर आपल्या आजुबाजूला होणाऱ्या बदलांची सुरुवात आपण केलेल्या निवडीपासूनच होते, असं तिनं म्हटलं आहे.
View this post on Instagram
दियाचं पहिलं लग्न ऑक्टोबर २०१४ मध्ये साहिल संघाशी झाले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघा विभक्त झाले. एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी सोशल विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिलं, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर दियाने वैभव रेखीला डेट केले. लॉकडाउनच्या काळात दिया आणि वैभव यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अखेर १५ फेब्रुवारी २०२१ मध्ये ते लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.