बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिच्या पतीने साहिल संघाने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये दिया तिच्या घटस्फोटावर मोकळेपणे व्यक्त झाली आहे. अलिकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने घटस्फोटाच्या दु:खातून स्वत:ला कसं सावरलं हे सांगितलं.

दिया आणि साहिल एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतरही या दोघांमधील मैत्रीचं नात कायम आहे. त्यामुळे ती मुलाखतींमध्ये साहिलविषयी उघडपणे व्यक्त होत असते. यावेळीदेखील तिने तिच्या भावनांना वाट मोळकी केली. तसंच घटस्फोटानंतर कोणत्या व्यक्तींमुळे सावरण्यास मदत झाली ते सांगितलं.
एक सेलिब्रिटी असल्यामुळे माझं प्रोफेशन मला दु:खी राहण्याची परवानगी देत नाही आणि हे दु:ख सहन करण्याची ताकद मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. मी चार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले. आज या घटनेला ३४ वर्षे झाली. जर चार वर्षांची असताना मी हे दु:ख सहन करु शकते तर वयाच्या ३७ व्या वर्षी का नाही?, असं दिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, बऱ्याचदा भीतीपोटी महिला आणि पुरुष कोणताही निर्णय घेण्यासाठी घाबतात. परंतु सगळं काही ठीक होईल या एका हिंमतीवर निर्णय घ्यायचे असतात. घटस्फोट घेऊन मला त्याचा पश्चाताप होत नाही.

वाचा : ‘प्रियकराने मला मारहाण केली होती’; नीना गुप्तांनी सांगितली आपबिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिया आणि साहिल जवळपास ११ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. लग्नापूर्वी ते एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१४ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. परंतु त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.