सध्याच्या घडीला केवळ ‘पद्मावती’ चित्रपटाचीच चर्चा आहे. जो तो या चित्रपटाचे पोस्टर्स, ट्रेलर आणि गाण्याबद्दल बोलत आहे. त्यातही चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणने तर सर्वांचे विशेष लक्ष वेधलेय. याआधी ‘मस्तानी’ या ऐतिहासिक भूमिकेत दिसलेल्या दीपिकाबद्दल यावेळी जरा जास्तच चर्चा केली जातेय. एकंदरीतच तिचा शाही लूक तिच्या सौंदर्यात अधिक भर टाकत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘घुमर’ गाण्यात तिने केलेल्या राजस्थानी नृत्याचीही प्रशंसा केली जातेय. मात्र, तिच्यावर होणाऱ्या कौतुकाचा वर्षाव कदाचित एका व्यक्तीला रुचत नसल्याचे दिसते. ती व्यक्ती म्हणजे बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत. आता तुम्ही म्हणाल, कंगनाच्या मनात दीपिकाविषयी इर्ष्या असण्याचे कारण काय?

वाचा : ‘घुमर’ गाण्यात दीपिकाने घातलेल्या लेहंग्याची किंमत माहितीये का?

खरंतर कंगना रणौतही आगामी चित्रपटात एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. आपल्या पराक्रमाने सर्वांसाठी खऱ्या अर्थाने ‘क्वीन’ ठरलेल्या झाशीच्या राणीची भूमिका ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’मध्ये ती साकारतेय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरील कंगनाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर तिचा हा व्हायरल झालेला लूक चर्चेचा विषय ठरला. कपाळावर टिकली, जुन्या काळातील केशरचना, चेहऱ्यावरील तेज या सर्व गोष्टींमुळे तिचे सौदर्यं आणखीनच खुलल्याचे फोटोंमध्ये दिसून येत होते. पण, हे फोटो लीक करण्यामागे कंगनाचाच हात असल्याचे म्हटले जातेय. सध्याच्या घडीला दीपिकावर प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे लक्ष केंद्रित असल्यामुळे कंगना काहीशी घाबरली असून, तिने जाणीवपूर्वक राणी लक्ष्मीबाईच्या लूकमधील फोटो लीक केल्याची चर्चा आहे.

वाचा : अबब! मालिकेसाठी ५०० कोटींचा खर्च

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवरचे कंगनाचे फोटो लीक होणे हा योगायोग नव्हताच. तर हा योगायोग घडवून आणला गेला होता. कारण हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अद्याप बराच काळ आहे. पण दीपिकावर खिळलेलं लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठीच तिने असे केलेय. जेणेकरुन आतापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीचे कुतूहल जागवण्यात टीमला यश मिळू शकेल.