बॉलिवूडच्या अभिनेत्रींना आपल्या कपड्यांवरून, लूकवरून अनेकदा टीकांना सामोरं जावं लागतं. मागील काही दिवसांत कपड्यांवरून प्रियांका चोप्रा, ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख आणि दीपिका पदुकोण यांच्यावर नेटीझन्सकडून टीकांचा भडीमार झाला. आता पुन्हा एकदा प्रियांका टीकांची शिकार झाली आहे. तिच्या नाकावरून सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

मुंबईमध्ये परतण्याआधी प्रियांकाने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सर्वांचे लक्ष तिच्या नाकावर गेलं आणि तोच चर्चेचा विषय बनला. प्रियांकाने जवळून आपला फोटो काढल्याने त्यामधील तिचे नाक पाहून सर्जरी केल्याचा संशय अनेकांना आला. ‘तुझं नाक अत्यंत विचित्र दिसत असून तू सर्जरी केलीस का ?’ असा सवालही यावेळी टीकाकारांनी केला. नाकाबद्दल प्रियांकावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही एका मुलाखतीत नाकाच्या सर्जरीबद्दल प्रश्न विचारले गेले. आपल्या टीकाकारांना अगदी चपखलपणे उत्तर देणारी ‘बेवॉच’ गर्ल प्रियांका यावेळी कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे असेल.

https://www.instagram.com/p/BVCQ560gC1B/

वाचा : शाहरूख खानवर आलिया भट्ट का आहे नाराज?

अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’मध्ये मुख्य भूमिकेपासून, पहिला हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’मध्ये केलेले काम आणि अनेक जागतिक कार्यक्रमांच्या रेड कार्पेटवर झळकण्यापर्यंत प्रियांका चोप्राने जगभरात नाव कमावलं आहे. अभिनय क्षेत्रात प्रभावीपणे आपली एक स्वतंत्र आणि वेगळीच ओळख प्रियांकाने निर्माण केली आहे. मात्र आजही तिला कपड्यांवरून आणि लूकवरून टीकांना सामोरे जावे लागणे ही दु:खद बाब आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रुती हसनवरही सर्जरीबद्दल टीका करण्यात आली. ‘मी याबाबत काहीच बोलणार नाही. कारण मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधिल नाही,’ असे म्हणत श्रुतीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेले.