छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या रिअॅलिटी शोचे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करतना दिसतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सकुता पाहायला मिळते. आता ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनच्या फॉरमॅटमध्ये थोडे बदल करण्यात आल्याचे म्हटले जात आहेत. अशातच शोसाठी सलमान किती मानधन घेणार असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिग बॉस पर्व १४साठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉसचे पर्व १३ हिट ठरले होते. त्यामुळे या सीझन बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. तसेच करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शोमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाच्या पार्श्वभूमिवर मालिकांच्या आणि चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी देण्यात आली. मात्र त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले. त्यामुळे या नियामांचे पालन करत बिग बॉसचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.