अभिनेत्री सोनम कपूर आणि तिच्या खासगी जीवनाविषयी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. पण सोनम मात्र तिच्या खासगी जीवनाविषयी इतक्या उघडपणे कधीच व्यक्त होत नाही हेच खरे. असे असले तरीही सोनमची बहिण रिहा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोमधून मात्र सोनमच्या ‘लव लाईफ’च्या गुपिताविषयी अनेकजण तर्क लावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनम दिल्लीस्थित आनंद अहूजासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच रिहाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये सोनमच्या कुटुंबियांसोबत आनंदसुद्धा दिसत असल्यामुळे या दोघांच्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या फोटोमध्ये सोनम आणि आनंद एकमेकांचा हात हातात घेतलेले दिसत आहेत. खिलाडी कुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटाच्या पार्टीमध्ये सोनम आणि आनंद पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची बी टाऊनमध्ये चर्चा रंगत होती.

नुकताच लंडनमध्ये ‘बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘मिर्झिया’चा प्रिमिअर शो मोठ्या थाटात पार पडला. यावेळी हर्षवर्धनला पाठिंबा देण्यासाठी सोनम आणि बाबा अनिल कपूरही तेथे उपस्थित होते. पण प्रिमिअर शो झाल्यानंतर सोनम भारतात परतली नसून लंडनमध्येच थांबली होती. पण लंडनमध्ये ती कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत नसून एका अपार्टमेन्टमध्ये तिच्या तथाकथित प्रियकरासोबत राहात असल्याची चर्चा होती.

आनंद अहुजा हा दिल्लीस्थित व्यावसायिक आहे. ‘भाने’ या नावाने त्याची स्वतःची क्लोथिंग लाइन आहे. काही दिवसांपूर्वी सोनम त्याच्यासोबत वेळ घालवताना दिसली होती. पण, सोनमकडून किंवा कपूर कुटुंबियांकडून अद्यापही तिच्या आणि आनंदच्या नात्यासंबंधीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Crew love.

A photo posted by Rhea Kapoor (@rheakapoor) on