वयाच्या ४९व्या वर्षीही तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता आर. माधवन प्रचंड लोकप्रिय आहे. १९९९ मध्ये माधवनने सरिताशी लग्न केलं. त्यांना वेदांत नावाचा एक मुलगा आहे. ‘रहना है तेरे दिल मै’ या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेल्या आर. माधवनची १९९१ मध्ये सरिताशी पहिली भेट झाली.

एका कार्यशाळेत माधवन वक्ता म्हणून बोलत होता. तर सरिता त्या कार्यशाळेत सहभागी झाली होती. यानंतर सरिता व माधवन एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९९९ मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नापूर्वी सरिता एअरहोस्टेस म्हणून काम करत होती. मात्र लग्नानंतर तिने फॅशन डिझायनर म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सरिताने माधवनच्या ‘गुरू एन आलू’ या चित्रपटासाठी डिझायनर म्हणून काम केलं.

आणखी वाचा : ‘स्वराज से बढकर क्या?’; ‘तान्हाजी’च्या रुपातील अजय देवगणचा लूक प्रदर्शित 

२००५ मध्ये सरिता आणि माधवन यांच्या घरी मुलाचे आगमन झाले. तेव्हा माधवन पत्नी व मुलासोबत चेन्नईत राहत होता. चार वर्षांनंतर म्हणजे २००९ मध्ये तो पत्नी व मुलासह मुंबईत स्थायिक झाला.