विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सोमवारी विवाहबंधनात अडकून चाहत्यांना सुखद धक्का दिला. गेल्या पाच- सहा दिवसांपासून सर्वत्र त्यांच्याच लग्नाची चर्चा पाहायला मिळतेय. अवघ्या ४४ पाहुण्यांच्या उपस्थितीत इटलीत पार पडलेल्या या लग्न सोहळ्याची माहिती आता सर्वांसमोर आली आहे. साखरपुडा, मेहंदी, हळद, लग्न, लग्नानंतरची डीजे पार्टी अशा सर्व कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. खरंतर बॉलिवूड कलाकारांना या लग्नासाठी निमंत्रित केलं नव्हतं. पण व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये अभिनेता रणबीर कपूर पाहायला मिळत होता. रणबीरने विरुष्काच्या लग्नाला हजेरी लावली नव्हती. पण त्याचे एक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण जोहरच्या 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटात रणबीर आणि अनुष्काने एकत्र काम केलं होतं. त्यातील 'चन्ना मेरेयाँ' या गाण्यातील लूक या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 'विरुष्का'च्या चाहत्यांनी हे गमतीशीर मीम तयार करून सोशल मीडियावर शेअर केले. #RanbirKapoor secretly caught during #ViratKohli and #AnushkaSharma's #wedding!! #virushkaKiShadi #VirushkaWEDDING #ViratWedsAnushka #ViratKiBaraat #Virushka #ViratWedsAnushka #viratAnushkaWedding #Bollywood #Cricket pic.twitter.com/pSqXDNS9Lz — Raghavendra Swamy (@bennishiroor) December 12, 2017 वाचा : अंकिता म्हणते मीच 'मणिकर्णिका..'ची नायिका विराट- अनुष्काचे फॅन फॉलोईंग खूप जास्त असल्याने त्यांच्या लग्नाची मागील काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलीच अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.