अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाची त्याचे जगभरातील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हैदराबादमधील चित्रीकरण आटोपल्यानंतर आता या चित्रपटाची टीम अबू धाबीला रवाना होत आहे. दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर या चित्रपटातील २० मिनिटांचं साहसदृष्य चित्रीत करण्यात येणार आहे. चित्रपटातील प्रभासच्या लूकसंदर्भात कमालीची गोपनियता पाळण्यात येत आहे. पोस्टरमध्येही त्याच्या चेहऱ्यावर मफलर गुंडाळलेला होता. कोणीही त्याचा फोटो काढून लीक करून नये यासाठी आता सेटवर मोबाईल फोन्सच्या वापरावरही बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

चित्रपटाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चित्रपटाचे हे पहिलेच आऊटडोअर शूटिंग असल्याने निर्माते थोडी जास्त काळजी घेत आहेत. सेटवरील सुरक्षाव्यवस्थेही वाढ करण्यात येणार असून मोबाईल फोन्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती लीक होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर प्रभासच्या व्हॅनिटी व्हॅन्सची संख्याही वाढवण्यात आली आहे.’

PHOTO : दीपिकाच्या पार्टीत सर्वांत आधी पोहोचला रणवीर

अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’ तेलगू आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात प्रभासव्यतिरिक्त श्रद्धा कपूर, अरुण विजय आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत. ‘रन राजा रन’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. प्रभासचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.