बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणजेच दिलीप कुमार यांनी सोमवारी ९५वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबिय आणि जवळचा मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
‘काही मोजके लोक उपस्थित होते. दिलीप साहब यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्यांना थोडा त्रास होत होता. दिलीप कुमार यांना दीर्घायुष्य लाभो,’ असं ट्विट फैझल फारूखी यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर केलं. या फोटोंमध्ये सायरा बानो आणि मित्रपरिवार पाहायला मिळत आहे.
https://twitter.com/TheDilipKumar/status/940280577386786816
अलीकडेच न्यूमोनियातून बरे झालेले दिलीप कुमार यंदा त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत असं म्हटलं जात होतं. डॉक्टरांनी त्यांना कोणताही संसर्ग होऊ न देण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती सायरा बानू यांनी दिली होती. त्यामुळे काही निकटवर्तिय सेलिब्रेशनला उपस्थित होते. सोशल मीडियावर काल दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. बॉलिवूड विश्वातील अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संदेश लिहिला.
https://twitter.com/TheDilipKumar/status/940258266919198720
Happy Birthday to my loving brother and a darling actor @TheDilipKumar, who inspired me to become an actor!! pic.twitter.com/yas9D9GO7q
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 11, 2017
Baar baar din ye aaye baar baar dil ye gay…. a living legend who has inspired generations. Wishing you a very happy birthday@TheDilipKumar ji pic.twitter.com/kYKvjvy4bb
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) December 11, 2017