बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु झालं आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या दोघांमधील भांडण आता शिगेला पोहोचलं आहे. दरम्यान या भांडणात बॉलिवूड कलाकारांनी दिलजीतच्या बाजूनं उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

“मी बोलले होते तुला थकशील तू, आज तूला दिलजीतने पंजाबीमध्ये समजावलं. आता तरी त्याची माफी माग” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने कंगनावर निशाणा साधला. तर दुसरीकडे प्रकाश राज यांनी “तू तर रॉकस्टार आहेस” असं म्हणत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. सोबतच कुणाल कामरा, कुब्रा सैत, फराह खान, गिंपी गरेवाल, हिमांशी खुराना यांसारख्या अनेक कलाकांनी कंगनाची खिल्ली उडवत दिलजीतला पाठिंबा दिला. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अवश्य पाहा – कंगनाची माघार? टीका करणाऱ्या अभिनेत्रीला ट्विटरवर केलं ब्लॉक

शेतकरी आंदोलन: ‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं कंगनाच्या अंगलट

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.