‘द कराटे किड’ आणि ‘रॉकी’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांचा दिग्दर्शक जॉन जी एविल्डसन यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ऑस्कर पुरस्कार विजेता दिग्दर्शक एविल्डसन यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे शुक्रवारी निधन झाले. एविल्डसन यांच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘रॉकी’. १९७६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

‘रॉकी’ चित्रपटाचे कथालेखन सिल्वेस्टरने लिहिले होते आणि एविल्डसन यांना त्याने दिग्दर्शन करण्यास सांगितले. एविल्डसन त्यावेळी दुसऱ्या चित्रपटाच्या कामात व्यस्त होते. मात्र काही आर्थिक कारणास्तव तोही चित्रपट रद्द झाल्याने एविल्डसन ‘रॉकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास तयार झाले. त्यावेळी त्यांना बॉक्सिंगबद्दल जराही माहिती नव्हती. केवळ १० लाख डॉलर बजेट असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण अवघ्या २८ दिवसांत पूर्ण झाले. ‘रॉकी’ प्रमाणेच ‘द कराटे किड’ चित्रपटसुद्धा सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाच्या इतर दोन भागांचे म्हणजेच ‘द कराटे किड पार्ट २’ आणि ‘द कराटे किड पार्ट ३’सुद्धा एविल्डसन यांनी दिग्दर्शित केलं.

वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

१९३५ साली जन्म झालेल्या एविल्डसन यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर जाहिरात लेखनाचं काम ते करत होते. चित्रपटांमध्ये सुरूवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं, त्यानंतर प्रोडक्शन व्यवस्थापक, छायाचित्रकार अशा सर्व विभागांमध्ये त्यांनी काम केलं.

VIDEO : ‘हसीना’ची खरी ओळख सांगणारा टिझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एविल्डसन यांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटदेखील बनणार आहे. ‘जॉन जी एविल्डसन : किंग ऑफ द अंडरडॉग्स’ असे या माहितीपटाचे नाव असणार. दिग्दर्शक डेरेक वेन जॉनसन यांच्या या माहितीपटात सिल्वेस्टर स्टॅलॉन, राल्फ मॅक्चिओ, मार्टिन स्कॉर्सेज, जॅरी विन्ट्रॉब आणि बर्ट रेनॉल्ड्स यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.