बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी दिशा चक्क बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. दिशाला एक बॉयफ्रेंड हवा आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – “करोनामुळे मंदिर बंद अन् दारुची दुकानं सुरु”; संतापला दाक्षिणात्य सुपरस्टार
दिशाचा एक टिक-टॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा म्हणतेय, “मला एक बॉयफ्रेंड हवा आहे. परंतु देवाने जर मला चार बॉयफ्रेंड दिले तर मी कोण होते नकार देणारी?” दिशाचा हा व्हिडीओ वूम्प्ला या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
दिशा पटानीचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडले जाते. अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेले आहे. या पार्श्वभूमीवर टायगरसोबत तुझे ब्रेकअप झाले का? असा प्रश्न तिला काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.