सध्या बॉलिवूडमध्ये कोणत्या स्टार कपलची सर्वांत जास्त चर्चा असेल तर ते म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी. आपल्या रिलेशनशिपबद्दल दोघांनी जरी उघडपणे वाच्यता केली नसली तरी अनेकदा या दोघांना एकत्र हँगआऊट करताना पाहिलं गेलं आहे. टायगर आणि दिशाला पुन्हा एकदा वांद्रे येथील एका रेस्तराँमध्ये पाहिलं गेलं. मात्र या लंच डेटला त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती.

वांद्रे येथील ‘स्मोक हाऊस डेली’ या रेस्तराँमध्ये दिशा आणि टायगर लंच डेटला गेले होते. यावेळी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफसुद्धा त्यांच्यासोबत होती. प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांमध्ये टिपलेल्या एका फोटोमध्ये दिशा आणि कृष्णा एकमेकींचा हाथ धरून रेस्तराँमधून बाहेर पडताना दिसतात.

वाचा : ‘स्टार किड’ला मागे टाकत नवअभिनेत्रीने मिळवला १५० कोटींचा चित्रपट

एका मुलाखतीत दिशासोबत वेळ घालवणं आपल्याला खूप आवडत असल्याचं टायगरने सांगितलं होतं. ‘आमच्या आवडीनिवडी सारख्याच असून या नात्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही,’ असं तो म्हणालेला. काही दिवसांपूर्वीच दिशा आणि टायगर लिव्ह- इनमध्ये राहणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. दिशाने नुकतंच वांद्रे येथे नवीन घर घेतलं असून त्याच घरात हे दोघे लिव्ह- इनमध्ये राहणार असल्याचं म्हटलं जात होतं.