निर्माते भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी सोनू निगमला उत्तर देण्यासाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला दाखवले आहे. पण स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओमध्ये घेतल्यामुळे दिव्या यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

नुकताच भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या ११ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी टी-सीरिजने अनेक बाहेरुन आलेल्या गायक, म्यूझिक दिग्दर्शक, कलाकारांना संधी दिल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी भूषण कुमार यांच्यावर लावण्यात आलेल्या मिटू आरोपांवरही वक्तव्य केले आहे. दरम्यान त्यांनी सोनू निगमला उत्तर देण्यासाठी त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला देखील घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar) on

गुलशन कुमार यांनी सोनू निगमला दिल्लीमध्ये रामलीलामध्ये पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सोनू यांना विमानाची तिकिटे देऊन मुंबईला येण्यास सांगितले होते. गुलशन कुमार यांनी सोनू निगमला बेटा तुला मोठा स्टार बनवेन असे म्हटले असल्याचे दिव्या यांनी पुढे सांगितले. दरम्यान दिव्या यांनी त्यांच्या घरात गेली कित्येक वर्षे स्वयंपाक करणाऱ्या शेरुला तेथे बोलावले. पण नेटकऱ्यांना ते फारसे आवडले नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी दिव्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दिव्या यांनी सोनू निगमला उत्तर देण्यासाठी व्हिडीओ शेअर केला. पण त्या व्हिडीओमध्ये घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला घेतल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. सध्या ट्विटरवर हॅशटॅग दिव्या खोसला कुमार ट्रेंड होऊ लागला आहे.