स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी. यामध्ये तिने साकारलेली ‘इशी माँ’ची भूमिका लोकप्रिय झाली आणि टीआरपी रेटिंगमध्येही ही मालिका अव्वल आहे. या मालिकेत आतापर्यंत बरेच बदल झाले. जुन्या कलाकारांच्या जागी अनेक नव्या कलाकारांची वर्णी लागली. मात्र, रमन आणि इशिता या दोन व्यक्तिरेखांची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. परंतु इशिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका लवकरच मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे.

मालिकेच्या पुढील भागांमध्ये मुलगी पिहू (रुहानिका धवन) हिचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात आणि काही गुंडांच्या हल्ल्यात इशिता गंभीर (दिव्यांका) जखमी होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू होतो. इतकंच नाही तर रमनच्या (करण पटेल) आयुष्यात एका नव्या स्त्रीची एण्ट्री करण्याच्या विचाराच मालिकेचे निर्माते आहे.

tharla tar mag arjun and sayali haldi ceremony
ठरलं तर मग : ‘या’ दोन व्यक्तींमुळे सायलीला लागणार अर्जुनची उष्टी हळद! काय आहे नवीन प्लॅन? पाहा प्रोमो…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Premachi Goshta serial time change after tejashri Pradhan exit
तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर घसरला टीआरपी अन् आता झाला मोठा बदल, नेमकं काय घडलंय? वाचा…
lakshmi niwas fame jahnavi aka divya pugaonkar shares her casting experience
“लक्ष्मी निवाससाठी माझी निवड सर्वात शेवटी…”, पहिला प्रोमो पाहून अभिनेत्रीचा झालेला ‘असा’ गैरसमज, किस्सा सांगत म्हणाली…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Jaydeep Gauri
मालिका संपल्यावर १ महिन्यातच जयदीप-गौरीचं ‘स्टार प्रवाह’वर कमबॅक! कारण आहे खूपच खास…; दोघांचा डान्स Video व्हायरल
premachi Goshta serial trp dropped after tejashri Pradhan exit
तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला बसला मोठा फटका, काय घडलं? जाणून घ्या…
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?

दिव्यांका आणि करणची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे हे बदल प्रेक्षकांना आवडणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मालिकेतील कलाकार बदलणे, कथानकात अचानक मोठे बदल आणणे या गोष्टी टेलिव्हिजन विश्वासाठी सामान्य आहेत. त्यामुळे इशिताचा पुनर्जन्म झाल्याचे दाखवल्यास नवल वाटायचे काही कारण नाही. सध्या तरी या मालिकेत दिव्यांका पुन्हा एकदा नव्या भुमिकेत दिसणार का, याबाबत कोणतीच माहिती निर्मात्यांकडून देण्यात आली नाही.

Story img Loader