बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करीनाने तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच नावं ‘प्रेग्नेंसी बायबल’ असे आहे. करीना या पुस्तकाच्या नावामुळे आणि त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. मी एक चांगली आई आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करायची गरजं नाही हे करीनाने पुस्तकात सांगितलं आहे.
करीनाने गेल्या वर्षी तैमूरच्या वाढदिवसानिमित्त ती प्रेग्नेंसीवर एक पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा केली होती. करीनाने सांगितले की तिला मुलांचा सांभाळ करतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकायची गरज वाटतं नाही. “सैफ आणि मी दोघे वर्किंग पेरेंट्स आहोत. आमच्या मुलांशिवाय आमचे आयुष्य काहीच नाही. मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी एक चांगली आई आहे हे सिद्ध करण्यासाठी इन्स्टाग्रामवर मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायचा नाही. एक आई म्हणून प्रत्येक दिवशी मी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते,” असे करीना म्हणाली.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘मला तैमूरची शी साफ करता येत नव्हती, मी एक परिपूर्ण आई नव्हते…’, करीनाने केला खुलासा
पुढे करीना म्हणाली, “जेहला जन्म दिल्यानंतर लगेच ज्या लोकांसोबत मी काम करणार होती त्या कामाला मी सुरुवात केली आहे. या वेळी मला जास्त घाई किंवा गडबड वाटतं नाही. तर मुलांना सोडून कामाला गेल्यामुळे आपल्याला अपराधी असल्याचे सारखे वाटणे सामान्य आहे. तैमूरचा जन्म झाल्यानंतर मी लगेच कामाला सुरुवात केली तरीही तैमूरचे माझ्यावर असलेले प्रेम जरासुद्धा कमी झाले नाही, आणि जेह बाबतीत सुद्धा हे होणार नाही.”
आणखी वाचा : ‘आपलीच मोरी आणि ***चोरी’, सरुआजींच्या त्या संवादामुळे देवमाणूस मालिका वादात
“दोन मुलांना जन्म देणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात खास गोष्ट ठरली आहे. माझ्या आठवणी आणि आनंदाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करायला मला आनंद होतं आहे,” असे करीना म्हणाली.