आमिर खानच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटातील एकेक भूमिकेवरून पडदा उचलल्यानंतर आता सर्व पात्रांसह एक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी सर्वच कलाकार उत्सुक असतात. आमिरचं हे मोठं स्वप्न होतं आणि आता एकाच पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत झळकल्याने त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा पोस्टर शेअर करत आमिरने लिहिले की, ‘पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणं हे माझं सर्वांत मोठं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झालं असून मला अजूनही विश्वास बसत नाही.’ आमिर आणि बिग बी यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेसुद्धा फार उत्सुक आहेत. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या निमित्ताने बॉलिवूडचे हे दोन दिग्गज एकत्र येत आहेत.

https://www.instagram.com/p/BoI40XkHRqo/

Video : थरार, गूढने परिपूर्ण असा अंगावर काटा आणणारा तुंबाडचा ट्रेलर पाहिलात का?

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ नोव्हेंबरमध्ये यशराज निर्मित हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत मोठा चित्रपट मानला जात आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे.

 

Story img Loader