अवघ्या पाच दिवसांत १५० कोटी रुपयांची घसघशीत कमाई ‘संजू’ या चित्रपटाने केली आहे. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात रणबीर कपूरने दमदार भूमिका साकारली आहे. प्रेक्षक- समीक्षकांकडून या चित्रपटाची प्रशंसा केली जात आहे. राजकुमार दिग्दर्शित या चित्रपटाची क्रेझ फक्त भारतातच नाही तर दुबईतही पाहायला मिळत आहे.

दुबईतल्या प्रेक्षकांना हा चित्रपट इतका आवडला आहे की त्यांच्यासाठी आता २४ तास चित्रपटगृहे सुरू ठेवण्यात येणार आहेत. फिल्मफेअरच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट पाहायला मिळत आहे. ‘जगभरात ‘संजू’ प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. दुबईमध्ये प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिथे चित्रपटगृहे २४ तास सुरू राहणार आहेत,’ अशी पोस्ट फिल्मफेअरने टाकली आहे.
‘संजू’ने प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसांत १२० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. येत्या काही दिवसांत हा चित्रपट कमाईचे आणखी कोणते विक्रम मोडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Video: पुलंच्या अजरामर व्यक्तिचित्रांवर आधारित ‘नमुने’चा ट्रेलर पाहिलात का?

या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच विकी कौशल, मनिषा कोईराला, परेश रावल, दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, जिम सर्भ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader