बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमिर खानचे असंख्य चाहते आहेत. आमिर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. तर आमिरचा भाचा इम्रान खान देखील चर्चेत आहे. तर त्यांच्या चर्चेत येण्याच कारण देखील त्यांच वैवाहिक जीवन आहे.

आमिरचा भाचा इम्रान चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी देखील काही दिवसांपासून तो त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत राहिला आहे. खरतरं, इमरानचे पत्नी अवंतिका मलिकसोबत चांगले संबंध नाहीत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केलं.

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

या दोघांच्या वैवाहित जीवनामध्ये कधीपासून तणाव आहे याची माहिती कोणाला नाही. मात्र, २०१८ ते २०१९ पर्यंत त्यांच्यात वाद सुरु होते आणि २०१९ मध्ये अवंतिका इम्रानचे घर सोडून तिच्या आई-वडिलांसोबत राहत असलेल्या चर्चांना उधाण आले होते. अवंतिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अवंतिका तिचं मत मांडताना दिसते.

आणखी वाचा : जेनेलिया नाही तर ‘हे’ आहे रितेशचे पहिले प्रेम

avantika_malik_instagram_story
आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर अवंतिकाने ही पोस्ट शेअर केली आहे,

 

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या वेळीही अवंतिकाने एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट शेअर करत, ‘इतक्या वर्षांमध्ये मी शिकले की तुम्ही कोणत्या ही गोष्टीतून पळ काढू शकणार नाही, कधीच नाही.’ या पोस्टवरून ती तिचा पती इम्रानबद्दल बोलत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Story img Loader