छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या बिग बॉस १४मधील स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याचे दिसत आहे. पण अभिनेता एजाज खानने अचानाक शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याने कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नव्हते किंवा त्याला चाहत्यांचे वोट कमी मिळाले नव्हते. पण एजाजच्या वर्क कमिटमेंटमुळे त्याला शोमधून बाहेर पडावे लागले असल्याचे म्हटले जाते.

नुकताच एजाज खानने त्याच्या वर्क कमिटमेंटमुळे बिग बॉस १४च्या घरातून एग्झिट घेतली आहे. तो १०६ दिवस बिग बॉसच्या घरात राहिला. आता कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात देवोलीनाची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा- ‘कलाकार म्हणून नाइट शिफ्टमध्ये काम करणे…’, कंगनाचे ट्वीट व्हायरल

एजाज खान बिग बॉसच्या घरात त्याच्या रागामुळे ओळखला जात होता. एकिकडे त्याची सतत घरातली स्पर्धकांशी भांडणे होत होती. तर दुसरीकडे तो अभिनेत्री पवित्रा पूनियाच्या प्रेमात होता. प्रोमोमध्ये बिग बॉस एजाजच्या घरातील प्रवासाविषयी सांगताना दिसत आहेत आणि नंतर त्याला घरातून बाहेर येण्यास सांगतात. ते ऐकून घरातील इतर स्पर्धकांना धक्काच बसतो. दरम्यान अर्शी खानला रडू कोसळते.