मिलन लुथरियाच्या ‘बादशाहो’ या चित्रपटाचा आणखी एक लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेता अजय देवगणच्या भूमिकेची झलक दाखवणारा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात तो ‘भवानी सिंह’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अजय मागोमागच या चित्रपटातील आणखी एका मुख्य अभिनेत्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘बादशाहो’मधील इम्रान हाश्मीच्या भूमिकेचा पहिला लूक प्रदर्शित झालाय आणि हा लूकसुद्धा अतिशय लक्षवेधी ठरत आहे. इम्रान यामध्ये राजस्थानी पगडी आणि टिळा लावून मारवाडी कुरता घातलेला पाहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये त्याच्या हातात देशी कट्टासुद्धा आहे. इम्रानचा हा असा अवतार यापूर्वी कोणत्याच चित्रपटात पाहिलेला नसल्याने त्याच्या भूमिकेविषयी या पोस्टरने अधिकच उत्सुकता निर्माण केली आहे.

१९७५ मधील आणीबाणीदरम्यान सोन्याने भरलेला ट्रक लुटणाऱ्या ६ जणांची कथा या चित्रपटात मांडलेली आहे. रजत अरोरा यांनी लिहिलेला हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अजय आणि इम्रानसोबतच ईशा गुप्ता, इलियाना डिक्रूज, विद्युत जामवाल अशी स्टारकास्ट या चित्रपटात असून आतापर्यंत फक्त अजय आणि इमरानचा लूक प्रदर्शित झालाय.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

वाचा : ‘तारक मेहता…’चा गोगी झाला दहावीत उत्तीर्ण

१३ जूनला ‘बादशाहो’चा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. अजय देवगणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा पोस्टर शेअर केला होता. या चित्रपटात सनी लिओनी एक विशेष आयटम साँगदेखील सादर करताना दिसणार आहे. ‘बादशाहो’ चित्रपटासाठी अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि मिलन लुथरिया दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलंय. त्यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तेव्हा आता त्यांच्या या त्रिकूटाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader