सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री ईशा गुप्ताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेमकं कशामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं ही माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. पण ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे.
ईशा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. आजारपणातही गॉगल लावून स्मितहास्य करताना पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, ‘जेव्हा तुमची क्षमता खूप असते. तेव्हा नियती तुम्हाला कधीकधी थांबवते. कारण तुम्हाला मोठं काहीतरी पुढे मिळणार असतं.’ यामध्ये पुढे तिने तिच्या कुटुंबियांचे आणि मित्रमैत्रिणींचेही आभार मानले.
https://www.instagram.com/p/BbYtKunAYJC/
वाचा : या चित्रपटात सलमानला ‘नो एण्ट्री’?
काही दिवसांपूर्वी टॉपलेस आणि न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. ‘माझे फोटो अश्लिल आहेत, असे कोणीही म्हणणार नाही. मला तिरस्कारापेक्षा प्रेमच अधिक मिळालं. पण विसरून जाण्यापेक्षा तिरस्कार केव्हाही चांगला,’ असं म्हणत तिने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं होतं.