बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत असतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती एका अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोची. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्री तिचा बाथरुममधील बोल्ड फोटो शेअर केला आहे.
‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला बाथरुममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री इशा गुप्ता हे नाव साऱ्यांनाच ठावूक असेल. इशा बऱ्याच वेळा तिच्या हॉट व बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहत असते. इशाने तिचा बाथरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात तिचा चेहरा दिसत नाहीये. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावं लागतं. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं. तसंच २०२० या वर्षात मीच सगळ्यात जास्त ट्रोल झाली असेन असंदेखील तिने या मुलाखतीत म्हटलं होतं.
दरम्यान, इशा ‘जन्नत 2’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’, ‘बादशाहो’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसंच येत्या काळात ती दोन चित्रपट आणि तीन वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.