बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा फार कमी रिअॅलिटी शोमध्ये दिसतात. पण जेव्हाही त्या रिअॅलिटी शोमध्ये येतात तेव्हा साऱ्यांचेच लक्ष फक्त त्यांच्यावरच असते. सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. रिअॅलिटी शोची परीक्षक शिल्पा शेट्टीने अनोख्या पद्धतीने रेखा यांचे शोमध्ये आल्याचे आभार मानले. फार कमी रिअॅलिटी शोमध्ये दिसणाऱ्या रेखा माँ तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात याबद्दल आम्ही सर्वच आभारी आहेत.

‘सुपर डान्सर २’ च्या सेटवर स्पर्धकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या आल्या होत्या. रेखा यांना लहान मुलं फार आवडतात. त्यामुळेच त्यांनी या शोमध्ये सहभागी होण्याचे लगेच मान्य केले. यावेळी त्यांची सिल्कची साडीही अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. त्यानंतर रेखा यांनी रंग बरसे या गाण्यावर नृत्य केले. याशिवाय त्यांच्या इतर गाजलेल्या गाण्यावरही त्यांनी ठुमके लगावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.