‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ फेम सुपरस्टार जॉनी डेपला डिस्ने स्टुडिओने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जॉनीची घटस्फोटीत पत्नी अॅम्बर हर्डने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. या आरोपांखाली डिस्नेने त्याला आपल्या चित्रपटांमधून बाहेर केले आहे. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत जॉनीच्या एक्स गर्लफ्रेंड्स मात्र त्याच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांनी अॅम्बर हर्डचे दावे फेटाळून लावले आहेत.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

द सनला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री व्हेनेसा पॅराडिसने जॉनी बाजू घेतली. ती म्हणाली, “जॉनी अत्यंत शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. तो खूपच प्रेमळ आहे. कधीकाळी आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो त्यामुळे त्याच्याबाबत मी ठामपणे सांगू शकते. तो कुठल्याही स्त्रीवर हात उचलू शकत नाही. किंबहूना अॅम्बर हर्ड खोटं बोलत आहे. तिने कोर्टात केलेला एकही दावा अद्याप सिद्ध झालेला नाही. तिने केवळ पैसे मिळण्यासाठी हे खोटे आरोप केले आहेत.”

अवश्य पाहा – अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी

 

View this post on Instagram

 

A post shared by Johnny Depp (@johnnydeppofficial) on

आता या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे व्हेनेसाच्या मतांशी विनोना रायडर, केस मोस, शर्लिन फेन या तिघी सहमत आहेत. कधीकाळी या चारही अभिनेत्री जॉनीच्या गर्लफ्रेंड्स म्हणून ओळखल्या जायच्या. मी टू या चळवळीला पाठिंबा देण्याऱ्या हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी देखील जॉनीची बाजू घेतली आहे. जॉनी डेपच्या प्रकरणामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत आता महिला कलाकारांमध्येच दोन भाग पडले आहेत. एक बाजू ठामपणे त्याच्यासोबत आहे, तर दुसरी बाजू त्याला चित्रपटांमधून बाहेर केल्याचा आनंद व्यक्त करत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करुन घटस्फोट घेतला होता. या आरोपांमुळे डिस्ने स्टुडिओने त्याला ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ सीरिजमधून बाहेर केले. त्यानंतर लीक झालेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे ते आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. या खोट्या आरोपांमुळे जॉनी डेपचे चाहते मात्र संतापले आहेत.