जुन्या चुका, कटू आठवणी, वाईट अनुभव या सर्व गोष्टी बाजूला सारून ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माने नवा शो सुरू केला आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. मात्र त्याच्या ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या शोच्या शूटिंगलाही ग्रहण लागलंय असं म्हणावं लागेल. कारण नवाकोरा शो सुरू होऊन आठवडाही पूर्ण झाला नाही तोच एका सेलिब्रिटीसोबत शूटिंग रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कपिलच्या शोमध्ये हजेरी लावणार होती. बुधवारी याचं शूटिंग होणार होतं. मात्र ऐनवेळी कपिलने हे शूटिंग रद्द केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याने हे शूटिंग रद्द का केले याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. करिअरची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्याची संधी कपिलसमोर या नव्या शोच्या माध्यमातून आली. मात्र शूटिंग रद्दच्या घटना समोर आल्याने त्याच्यावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.

Shubamn Gill Touches Feet of Abhishek sharma Mother Video Viral
IPL 2024: शुबमन गिलने स्टेडियममध्येच अभिषेक शर्माच्या आईला खाली वाकून केला नमस्कार, Video व्हायरल
Anushka Sharma Namaste Celebration Viral on RCB Win
IPL 2024: आरसीबीने दिल्लीवर विजय मिळवताच अनुष्का शर्माने जोडले हात, भन्नाट प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
ipl 2024 rohit sharma and abhishek nayar leaked conversation created a ruckus before the kkr vs mi match video viral
“भावा, हे मंदिर मी बनवलंय; पण हे माझं शेवटचं…” रोहित शर्माच्या ‘त्या’ VIDEO ने खळबळ; MI मधून बाहेर पडण्याची चर्चा
Rilee Rossouw gun shot celebration
PBKS vs RCB : विराट कोहलीने रायली रुसोच्या सेलिब्रेशनची नक्कल करत दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
punjab kings vs chennai super kings match preview
IPL 2024 : फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष; चेन्नई सुपर किंग्जसमोर आज पंजाब किंग्जचे आव्हान
Virat Kohli Helped Will Jacks to Find Rhythm GT vs RCB IPL 2024
IPL 2024: विराटमुळेच विल जॅक्स करू शकला वेगवान शतक, जॅक्सने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल

https://www.instagram.com/p/BgtgXSQhXXM/

वाचा : कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता?

सहकलाकार सुनील ग्रोवरशी वाद झाल्यानंतर कपिलच्या जुन्या शोवर बराच परिणाम दिसून आला होता. शाहरुख खान, अजय देवगण यांसारख्या सेलिब्रिटींचे शूटिंग त्याने ऐनवेळी रद्द केले होते. इतकंच नव्हे तर तो व्यसनाधीनही झाला होता. या सर्व कारणांमुळे सोनी वाहिनीकडून कपिलला काही काळ ब्रेक देण्यात आला. ब्रेकनंतर कपिल पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. प्रेक्षकांकडूनही कपिलच्या नव्या शोकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. आता कपिल या चुका टाळत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.