बॉलिवूडध्ये एकापेक्षा एक सुपुरहिट सिनेमा देत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा कधी भेटीला येणार यासाठी चाहते आतूर आहेत. २०१८ सालानंतर शाररुख खान कोणत्याही सिनेमात झळकलेला नाही. त्यामुळे शाहरुखला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
नुकताच कोरिओग्राफर फराह खानने शाहरुख खानसोबतचा एक धमाल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात शाहरुख आणि फराह लोकप्रिय ठरलेल्या २००४ सालामधील ‘मै हू ना’ या सिनेमातील टायटल साँगवर डान्स करताना दिसत आहे. ‘मै हू ना’ या गाजलेल्या गाण्यावर शाहरुख त्याच्या खास रोमॅण्टिक स्टाइलमध्ये थिरकतोय. तर फराहदेखील डान्स एन्जॉय करतेय. डान्सच्या शेवटी फराह शाहरुखच्या गालावर किस करताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत फरहाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “माझ्या सर्वात आवडता एकमेव शाहरुख खान. इथे तुझ्यासारखा दुसरा कुणीही नाही”
हे देखील वाचा: ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ‘तो’ शब्द उच्चारताना अमिताभ बच्चन यांची देखील बोबडी वळली
View this post on Instagram
फराह आणि शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शाहरुखच्या चाहत्यांकडून व्हिडीओला मोठी पसंती मिळताना दिसतेय. तर फराह या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख म्हणाला, “कायम आवडता” तर रणवीर सिंग म्हणाला, “ओहहहहह हृदय पाघळलं” त्यासोबतच क्रिती सेनॉनने देखील इमोजी पोस्ट करत व्हिडीओला पसंती दिलीय.
हे देखील वाचा: “करण जोहर सलमान खानपेक्षाही…”; सोफिया हयातची ‘बिग बॉस’शोवर टीका
२०१८ सालामध्ये आलेल्या ‘हिरो’ सिनेमानंतर शाहरुखला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. सध्या शाहरुख ‘पठाण’ या सिनेमाच्या प्रोजेक्टवर काम करतोय. अद्याप निर्मत्यांकडून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी २०२२ सालामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल अशा चर्चा आहेत. या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादूकोण आणि जॉन अब्राहम देखील झळकणार आहेत.