गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फरहान अख्तरचा ‘तूफान’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात फरहान एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. डोंगरीतील गुंड ते एक बॉक्सर होण्या पर्यंतचा त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्याच्या प्रेयसीची भूमिका ही अभिनेत्री मृणाल ठाकूरने साकारली आहे. मृणाल त्याला बॉक्सिंग चॅम्पियन होण्यासाठी प्रवृत्त करते. या चित्रपटाची पटकथा ही बॉक्सर अझीझ अलीच्या आयुष्यावर आहे. मात्र, नेटकऱ्यांना अझीझ आणि डॉ. पूजा शहा उर्फ मृणालीच लव्ह स्टोरी आवडली नाही. सोशल मीडियावर या चित्रपटाचा बहिष्कार करण्यात यावा अशी मागणी नेटकरी करताना दिसत आहेत. #Boycott Toofaan हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट करत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. अनेक नेटकऱ्यांना त्यांची लव्ह स्टोरी आवडलेली नाही. काही नेटकरी म्हणाले की हे ‘देशाच्या संस्कृतीच्या विरोधात आहे.’ एक नेटकरी म्हणाला, ‘हा चित्रपट आणि अभिनेता चांगला नाही. त्यांची विचारसरणी चांगली नाही आणि बॉलिवूड बेकार आहे म्हणून मी माझ्या सगळ्या सहकारी नेटकऱ्यांना विनंती करतो की #BoycottToofaan.’ दुसरा नेटकरी म्हणाला की, ‘तूफान चित्रपट आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडच्या सगळ्या चित्रपटांवर बहिष्कार घाला,’ असे अनेक ट्वीट करत नेटकऱ्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची विनंती केली आहे.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटात फरहान आणि मृणालसोबत अभिनेते परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परेश रावल फरहानच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. हा चित्रपट १६ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.