कलाकार म्हटल्यावर अभिनयासोबतच सौंदर्यालाही अनन्यसाधारण महत्त्व असते. कमनीय बांधा हा आजच्या घडीला ट्रेण्डमध्ये असलेला विषय. सध्या आपल्याला अनेक अभिनेत्री फिटनेसचे महत्त्व समजावून सांगताना दिसतात. हिना खान, जुही परमार या अभिनेत्रीनंतर आता ‘चिडिया घर’, ‘महाभारत’ आणि ‘सपना बाबुल का… बिदाई’ या मालिकांमध्ये तसेच ‘गेस्ट इन लंडन’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शफाक नाझनेही फिटनेसकडे लक्ष देण्याचे ठरवलेले दिसते.

वाचा : ‘पॉर्न स्टारला स्वीकारता, मग बलात्कार पीडितेला स्वीकारताना संकोच का?’

गेल्या सहा वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत असलेल्या शफाकने कामातून स्वतःसाठी वेळ देण्याचे ठरवले. आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच नावाजल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. शफाकने केवळ दोन महिन्यांमध्ये तब्बल १३ किलो वजन घटवलेय. आधी ७६ किलो वजन असलेली ही अभिनेत्री आता ६३ किलोवर आली असून, लवकरच ती पुढच्या प्रोजेक्टमध्ये या हटके लूकमध्ये दिसेल.

वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीने गमावली आमिरसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी

आपल्या या नव्या लूकबद्दल शफाक म्हणाली की, ‘कामामुळे मला स्वतःला वेळच देता येत नव्हता. त्यामुळे मी कामातून ब्रेक घेऊन वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. डाएट आणि नियमित व्यायामावर लक्ष दिले. स्वत:मध्ये झालेला बदल पाहताना मला खूप आनंद होतोय. पुढच्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला पूर्णपणे नव्या लूकमध्ये पाहण्यास मी उत्सुक आहे. चाहत्यांनाही माझा हा नवा लूक आवडेल अशी आशा आहे.

https://www.instagram.com/p/BZaQWrznozQ/

https://www.instagram.com/p/BZVYQs8nnO6/