आमिर खानच्या दंगल सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलेली फातिमा सना शेख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी ती ‘दंगल’ सिनेमामुळे नाही तर तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. जीक्यू मासिकासाठी तिने नुकतेच फोटोशूट केले यातले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. जून महिन्याच्या मासिकासाठी तिने हे फोटोशूट केले होते. मालदिवच्या निळ्याशार समुद्रामध्ये काळ्या रंगाच्या स्विम सूटमध्ये फातिमा फार मादक दिसते यात काही शंका नाही. याआधी फेमिना मासिकासाठी फातिमाने फोटोशूट केले होते. त्या मासिकात फातिमा नवरीसारखी सजली होती.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

https://www.instagram.com/p/BVAGcWjHoP-/

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा आगामी सिनेमा ‘ठग्ज् ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमातल्या फातिमाच्या भूमिकेमुळेही ती चर्चेत आली होती. या सिनेमासाठी फातिमाच योग्य निवड असून ती या सिनेमाची हिरोईन आहे असे आमिरने सांगितले होते. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

https://www.instagram.com/p/BVB3WAbgfQT/

https://www.instagram.com/p/BU-OkXUlgIr/

या सिनेमाबद्दल बोलताना फातिमा म्हणाली की, ‘हा एक फार मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा प्रोजेक्ट आहे. शिवाय या सिनेमात अमिताभ बच्चन आणि आमिर खान ही दोन दिग्गज नावं असल्यामुळे या सिनेमाचा एक भाग होणंच माझ्यासाठी खूप आहे.’