बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख दंगल गर्ल म्हणून ओळखली जाते. फातिमा तिच्या सुंदरतेमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी ती आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. यावेळी आता फातिमाने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाचा विषयी खुलासा केला आहे. एवढंच नाही तर फातिमाला कास्टिंग काऊचचा देखील सामना करावा लागला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी एक मुलाखतीत फातिमाने कास्टिंग काऊच आणि लहाण असताना झालेल्या लैंगिक शोषणाविषयी सांगितले होते. ‘ती 3 वर्षांची असतानाच तिचा विनयभंग झाला होता. हे कोणत्याही स्त्रिसाठी एका कलंकाप्रमाणे आहे की त्याविषयी कधीही बोलू शकत नाही. पण आता मला आशा आहे की, आता काळ बदलला आहे. आधी या विषयी कोणाला सांगू नका किंवा या विषयी काही बोलू नका लोकांचा गैरसमज निर्माण होईल, असे म्हटले जात होते. मात्र, आता आपल्या देशात आणि जगभरातील लोकांमध्ये लैंगिक शोषणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे,’ असे फातिमा म्हणाली.

आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..

पुढे एका मुलाखतीत फातिमाने कास्टिंग काऊच विषयी खुलासा केला होता. कास्टिंगमुळे तिला कित्येकदा काम गमवावं लागलं होतं. ती म्हणाला की, ‘मला बऱ्याच वेळा ऐकावं लागलं की तू कधीही अभिनेत्री बनू शकणार नाहीस. तू दीपिका पदुकोण किंवा ऐश्वर्या रायसारखी दिसत नाही. तू अभिनेत्री कशी बनशील? बरेच लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटतं की हे ठीक आहे, हे लोक सौंदर्याकडे एवढं पाहतात की अशी ठरावीक दिसणारी मुलगी अभिनेत्री होऊ शकते. त्या श्रेणीत मी बसत नव्हती. मात्र, आता माझ्याकडे अनेक संधी आहेत. माझ्यासारख्या लोकांसाठीही चित्रपट बनवले जातात, जे सामान्य दिसतात, सुपरमॉडल्ससारखे दिसत नाहीत.’

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

पुढे फातिमा म्हणाली, ‘मी कास्टिंग काऊचचाही सामना केला आहे. मला बऱ्याचवेळा असे सांगितले गेले की तू सेक्स केलं तर तुला काम मिळेल

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatima sana shaikh once spoke about harresment at the age of 3 and casting couch dcp