बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप होईल आणि कोणाचे पॅचअप होईल, हे काही सांगता येत नाही. आता करिना कपूर आणि शाहिद कपूरचंच पाहा ना… कधी काळी करिना आणि शाहिद हे बॉलिवूडचे हॉट कपल होते. पण हे हॉट कपल फार काळ एकत्र राहू शकले नाही आणि त्यांच्यात ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर हे दोघं कधीही एकमेकांसमोर आले नाहीत. पण एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे कधी ना कधी एकमेकांसमोर येणं टाळू शकत नाही. नुकतेच ते फिल्मफेअरच्या पुरस्कार सोहळ्यात एकमेकांसमोर आले. पण करिनाने शाहिदला पाहताच नजर दुसरीकडे वळवली.

करिना कपूर खान रेड कार्पेटवर प्रसारमाध्यमांना फोटो देत होती. त्याचदरम्यान शाहिदही तिथे पोहोचला. शाहिदला रेड कार्पेटवर येताना पाहताच करिना त्याला पाठ दाखवून निघून गेली. करिनाने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराला दुर्लक्ष करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पुरस्कार सोहळ्यात बिनधास्त लूकमध्ये आलेल्या करिनाने आपला भूतकाळ कधीच कोणाला कळू दिला नाही. शाहिदशी निगडीत कोणतीच गोष्ट तिने आजपर्यंत कोणालाही कळू दिलेली नाही. या पुरस्कार सोहळ्यात शाहिदला मोस्ट स्टायलिश अवॉर्ड मिळाला तर दुसरीकडे करिनाला या वर्षीचा ट्रेंडसेटर अवॉर्ड मिळाला. करिना सध्या वीरे दी वेडिंग सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तर शाहिदचा पद्मावती सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. करिना आणि शाहिद या दोघांनी ब्रेकअपनंतर उडता पंजाब या सिनेमात एकत्र काम केले होते.