गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. त्यामुळे या काळात चित्रपटगृह, नाट्यगृह सारं काही बंद असल्यामुळे प्रेक्षकांचा कल ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र बऱ्याच वेळा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपट पाहायला मिळतात. या चित्रपटांच्या तुलनेत ओटीटीवर मराठी चित्रपटांची संख्या अत्यंत कमी असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच केवळ मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच प्लॅनेट मराठी हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु होणार आहे. यात केवळ मराठी चित्रपट आणि वेबसीरिज पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

बऱ्याच वेळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी किंवा अन्य भाषिक चित्रपटांचा भरणा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी प्रत्यके मराठी चित्रपट सहज ओटीटीवर उपलब्ध व्हावा यासाठी अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. या ओटीटीवर तब्बल १० नव्या कोऱ्या मराठी वेबसीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसंच या ओटीटीवर १० नव्या कोऱ्या वेबसीरिजसोबत लहान मुलांसाठीदेखील खास मनोरंजनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांचं भावविश्व उलगडण्यासाठी ८५० तासांचा नवा कंटेट तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री,संगीत संयोजक आदित्य ओक यांच्या संकल्पनेतून या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात होत आहे. डिसेंबर २०२० पासून प्लॅनेट मराठी हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु होणार आहे.

Story img Loader