इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि गेल्या वर्षभरापासून भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक- संगीतकार अदनान सामी आता ‘अफगान : इन सर्च ऑफ अ होम’ या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने बुधवारी रात्री अदनानच्या या पहिल्या सिनेमातील लूक त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या सिनेमात सामी एका संगीतकाराचीच भूमिका साकारणार आहे.
अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा
बुधवारी अदनाननेही आपल्या ट्विटरवरून ही बातमी शेअर केली. सामीने ट्विट करत म्हटले की, ‘अफगान : इन सर्च ऑफ अ होम’ या सिनेमासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. आज सामीने सिनेमाचे पहिले पोस्टरही त्याच्या ट्विटर अकाऊंटरवरून शेअर केले. या सिनेमाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू हे करणार आहेत. ‘भर दो झोली..’ या नावाजलेल्या गाण्याच्या या सुरेल गायकाने दोन्ही दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी उत्साही असल्याचे म्हटले आहे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतरचे अदनानचे हे पहिले प्रोजेक्ट आहे.
Adnan Sami to debut as an actor with Radhika Rao and Vinay Sapru's new film #Afghan – In Search Of A Home… Plays a musician in this movie. pic.twitter.com/l6CroDExg8
— taran adarsh (@taran_adarsh) June 28, 2017
I need ur blessings for #AfghanTheFilm pic.twitter.com/iHrwCIfScs
— Adnan Sami (@AdnanSamiLive) June 28, 2017
https://www.instagram.com/p/BV6MNaulh_D/
याआधीही अदनानने राधिका राव आणि विनय सप्रू यांच्यासोबत सलमान खानच्या ‘लकी… नो टाइम फॉर लव्ह’ या सिनेमात काम केले होते. याशिवाय ‘बजरंगी भाईजान’मधील ‘भर दो झोली मेरी’ हे कव्वाली गाणे त्याने गायले असून त्याच्यावरच ते चित्रीतही करण्यात आले होते.
अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू
पाकिस्तानी मूळ गायक अदनानला २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. गेल्याच महिन्यात त्याला कन्या रत्नही झाले. मुलीचं नाव त्याने मेदिना सामी खान असं ठेवलं आहे. मूळ अफगाणी असलेली पण जर्मनीमध्ये वास्तव्यास असलेली रोया ही अदनानची तिसरी पत्नी आहे. २०१० मध्ये अदनान आणि रोयाने लग्न केले होते.