माजी मिस वर्ल्ड डायना हेडन लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वीच्या फ्रोजन बीजाच्या सहाय्याने तिला मातृत्त्वाचे सुख मिळणार आहे. डायनाने २०१६ मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्याचा जन्मही अशाच प्रकारच्या फ्रोजन बीज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाला होता. जवळपास आठ वर्षांपासून ते बीज फ्रोजन अवस्थेत ठेवण्यात आले होते.

डायनाने ज्या प्रकारे मातृत्त्वाचे सुख अनुभवले आहे, ते पाहता गेल्या काही वर्षांमध्ये अपत्यप्राप्तीच्या पद्धतींमध्ये झालेली प्रगती आणि बदल या गोष्टीच स्पष्ट होत आहेत, असे डायनाच्या डॉक्टर नंदीता पालशेतकर म्हणाल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार डायनाने आयव्हीएफ डॉक्टरांना देवाचे दूतच म्हटले आहे. ‘ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येतात त्यांच्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान देवदूतच ठरत आहेत. माझ्या गरोदरपणाची बातमी फारच आनंदददायी असून, आता फक्त जगात येणाऱ्या बाळांचीच उत्सुकता आम्हाला लागून राहिली आह’, असे डायना म्हणाली.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

वयाच्या ४० व्या वर्षी डायना कॉलिन डिकच्या प्रेमात पडली होती. त्याचवेळी तिला एन्डोमेट्रीओसिसने ग्रासल्याचे लक्षात आले. यामुळेच तिला अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येत होत्या. शेवटी डायनाने फ्रोजन बीजाच्या सहाय्याने अपत्यप्राप्तीचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी अपत्यप्राप्तीसठी या पद्धतीचा अवलंब करणे फार आव्हानात्मक होते. पण, आता मात्र आधुनिकीकरणामुळे त्यात बऱ्याच सुधारणा आल्या आहेत.