कपूर कुटुंबात सध्या आनंदाचं, जल्लोषाचं वातावरण असून काही दिवसांतच या घरात सनईचौघड्यांचे आवाज घुमणार आहेत. कारण निमित्त आहे अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरच्या लग्नाचं. मंगळवारी लग्नाची तारीख जाहीर करत कपूर कुटुंबीयांनी सोनम आणि आनंद अहुजाच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. अवघे काही दिवस शिल्लक असताना सध्या बॉलिवूडच्या या ग्रँड वेडिंगची जोरदार तयारी सुरू आहे. सोनम आणि आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये सोनमला अनेकदा आनंदसोबत पाहिलं गेलं. मात्र अभिनय क्षेत्रातला नसल्याने आनंदविषयी फार काही माहिती कोणाला नाही. तर जाणून घेऊयात, सोनम कपूरच्या होणाऱ्या पतीविषयी..

आनंद अहुजा दिल्लीतील प्रतिष्ठित व्यावसायिक हरिश अहुजा यांचा मुलगा असून शाही एक्सपोर्ट्स या देशातल्या सर्वात मोठ्या निर्यात कंपनीचा मालक आहे. या कंपनीत तो सध्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहे. त्याला अमित आणि अनंद अहुजा असे दोन धाकटे भाऊ आहेत. दिल्लीतल्या अमेरिकन अॅम्बेसी स्कूलमध्ये आनंदने शालेय शिक्षण पूर्ण केलं तर पेन्सिलव्हॅनिया विद्यापिठातून त्याने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयातून पदवी घेतली. व्हर्टन या प्रख्यात बिझनेस स्कूलमधून त्याने एमबीएची पदवी घेतली आहे. दिल्लीत परतण्याआधी त्याने अमेरिकेत अॅमेझॉन डॉटकॉमसाठी काम केलं. दिल्लीला परल्यानंतर त्याने वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचा विचार केला.

https://www.instagram.com/p/BdIauZbFPSS/

कापडाचा प्रसिद्ध ब्रँड भानेचा तो संस्थापक असून ‘वेज नॉनवेज’ VegNonVeg या स्निकर बुटीकचाही तो मालक आहे. आनंदच्या शाही एक्सपोर्ट या कंपनीची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींची आहे.

https://www.instagram.com/p/Bce5kgUlAWq/

२०१४ मध्ये आनंदची सोनमशी भेट झाली. फॅशन डिझायनर आणि सोनमची स्टायलिस्ट प्रेरणा कुरेशीने आनंदची सोनमशी ओळख करून दिली होती. पहिल्या भेटीच्या महिन्याभरानंतरच त्याने सोनमला प्रपोज केलं असं म्हटलं जातं. मात्र, सोनमने या प्रपोजलचं उत्तर देण्यास बराच काळ घेतला. सोनमचे फोटो आणि तिच्या चित्रपटांविषयीचे बरेच पोस्ट आनंद त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

सोनमच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून ५ मे पासून मेहंदी, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ८ मे रोजी पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्यासाठी कपूर कुटुंबीयांसोबतच सोनमचे चाहतेही फार उत्सुक आहेत.

 

Story img Loader